पराशरापासून प्रवृत्त झालेल्या पराशर गोत्रात मीरपराशर, नीलपराशर, कृष्ण पराशर, श्वेत पराशर, श्यातपराशर व धुम्र पराशर असे सहा भेद आहेत. पराशराने जनकाला जे तत्चज्ञान उपदेशिलें, त्याचाच अनुवाद भीष्माने धर्मराजाला सांगितला.त्याला पराशरगीता असे नाव आहे. या शिवाय बृहत्पराशर होराशास्त्र, लहुपाराशरी, बृहत्पराशरीय धर्मसंहिता, पाराशय म्हणतात. ना नदीचे कुळ आणि ऋषीचे मुळ शोधू नये. कारण ते सापडतचं नसतात ! परंतू वेगवेगळया खंडातून उपलब्ध माहिती नुसार पराशर ऋषी यांचे वास्तव्य पारनेरचेच येथेच होते. या ठिकाणी त्यांच्या हस्ते मुर्तीची स्थापना करण्यात आली. येथील मंदिरात व जवळच सिध्देश्र्वरवाडी येथे सिध्देश्र्वराच्या मंदिरात त्यांनी तपसाधना केल्याचा उल्लेखही पुराणात आढळतो. पराशरांच्या वास्तव्याहुनच पारनेर शहराला पारनेर हे नाव पडले. पारनेर ही पराशरांची भुमी असा उल्लेखही अनेक ठिकाणी होतो. पराशर हा शक्तीचा पुत्र होता असे म्हटले आहे. त्यांना वशिष्ठपुत्र म्हटले आहे. आपले पती शक्तीयांना राक्षसांनी ठार मारले हे जेव्हा पराशरांना समजले तेव्हा सर्व राक्षसांचा संहार करण्याच्या हेतूने त्यानी राक्षस सत्र आरंभले पण त्यात निरपराध राक्षसही मारले जाउ लागले. म्हणून पुलस्त्यादी ऋषीनीं याना या सत्रापासून परावृत्त केले. सत्र थांबवल्याबददल पुलस्त्यादीनी त्यांना तु सफलशास्त्र पाखंत व पुराणवक्ता होशील असा वर दिला. धर्मसंहिता, पराशरोदितं, वास्तुशास्त्रम, नितीशास्त्रम व पराशरोदित केवल सारम हे ग्रंथ पराशरांच्या नावावर आहे. कृषीसंग्रह, कृषिपराशय व पराशरतंत्र हे ही ग्रंथ पराशरांच्याच नावावर आहे. पराशर नेमके कोण ? त्यांचे वास्तव्य कुठले? या बाबत विदवानांच्यात मत भेद असले तरी कृषिपराशर या ग्रंथांच्या आधारे इ.स.वि.स.न. च्या आधिचे नसावे असे वाटते. कृषि पराशर या ग्रंथात शेतीवर होणार ग्रहनक्षत्रांचा प्रभाव ढग व त्यांच्या जाती, पावसाचे अनुमान,नांगर, शेतीची देखभाल, बैलांची सुरक्षितता, धान्यांची पेरणी, कापणी संग्रह, शेणखत इत्यादी विषयांवर माहिती आहे. पराशर हे आयुर्वेद हे कर्ते व चिकित्सक होते. पराशर तंत्रात कार्यचिकित्सेवर जास्त भर दिलेला आहे. पराशरांनी हस्त्यायुर्वेद नावाचाही एक ग्रंथ लिहिलेला आहे. पुराणात पराशरांना एक सूक्त दृष्टा, वशिष्ठांचा पौत्र, गोत्र प्रर्वतक व ग्रंथकार म्हणून समजले जाते. ऋग्वेदच्या पहिल्या मंडळातील ६५ ते ७३ ही सुक्ते पराशरांच्या नावावर आहेत. व्यासऋषी एक अलौकिक व्यक्तिमत्वांचा महापुरुष, ग्रंथकार व महाज्ञानानी असलेले पराशर ऋषींचे पुत्र होत. पराशरपुत्र म्हणुन त्यांना पराशयेही म्हणत. पारनेरचे पराशर आणि त्यांचा पुत्र व्यास त्यांचा जन्म भारतातच झाला हिगोष्ट भारतीयांना अनंत काळापर्यत अभिमानास्पद राहिल. आजवर जगात असा दिव्योदात्ता, विदवान आणि साहित्यकार झाला नाही व होणार नाही असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती वाटणार नाही व वेदोत्तरकाळापासून तो आजतागायत व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे. इतिहास पुराणांची रचना, प्राचीन युगातील विस्मृत प्राय अशाविदया पुराणांची रचना, प्राचीन युगातील पिस्मृत प्राय अशा विद्या - कलांचे पुर्नजीवन, वेदवेदांगांचे संकलन संपादन आणि विभाजन या भगीरथ तुल्य प्रचंड उद्योगाने व्यासांनी भारतीय संस्कृती अक्षुण्ण राखली. इतिहासातले हे एक महदाश्चर्यच म्हणावे लागेल. पारनेरच्या भूमीतले पराशर आणि त्यांचे पुत्र व्यास हे पारनेरकरांसाठी अभिमानास्पद आहेत.