पारनेर

पूर्णवादी तिर्थक्षेत्र पारनेर गेल्या ५० वर्षात पूर्णवादाचार्य रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या पूर्णवादी परिवाराचे नगर जिल्हयातील पारनेर हे तीर्थक्षेत्र म्हणून चांगलेच नावारुपाला आलेले आहे. या ठिकाणी पूर्ववादाची अनेक मंदिरे, स्थळे आहेत. त्यामध्ये जीवनकला मंदिर ,रामचंद्र महाराजांचे कमळाकृती मंदिर,व समोर व्यासपीठ व तीनशे लोक बसतील असेसभाग ह, प्रल्हादगुरुवेदशाळा, गूरुवाडा यामध्ये भगवान शंकराची मृत्यूंजयाच्या ध्यानतली मूती असून अष्टभुजा मूतीच्या हाती वार अमृतकुंभ आहेत. काचेचे गोपालकृष्ण मंदिर व विठठल मंदिर , गुरुदर्शन वाडयात रामचंद्रमहाराजांचे वास्तव्य होते. येथे मेणाची [व्हॅक्स] रामचंद्र महाराजांची मूर्ती असूनतेथील दालनात तेवापरतअसलेल्या वस्तु ठेवलेल्या आहेत.पूर्णवाद म्हणजे याविषयी सांगताना विष्णू महाराज म्हणाले, आध्यात्मिक , आधीभौतिक, आदी दैविक म्हणजे पूर्णवाद, पूर्ण म्हणजे या विश्र्वात राहतो व विश्व तत्व, विष्णू तत्व व शिवतत्व या तीनही तत्वांना व्यापूनजो एकत्रिकरण उत्पत्ती (ब्रम्हा), लय (शिव), स्थिती (विष्णू) या तीनही शक्तींचा जो नियमन करतो. त्याला पूर्ण पुरष म्हणतात. ही वेदांची शिकवण आहे. म्हणून पूर्ववाद हे वैदिक तत्वाज्ञानाचा उद्घोष करणारे तत्वज्ञान आहे. त्याचे उदगाते रामचंद्र महाराज पारनेकर आहेत. नगरपासून ४० कि.मी. वर असलेले पारनेर हे कायम दुष्काळी गाव. त्यामुळे तेथील बहुतांशी मंडळी मुंबईत व्यवसाय करतात. रामचंद्र महाराज असताना हे साम्यवादयांचे गाव होते. महाराजांनी तत्वज्ञान , वेद व साम्यवादाचा अभ्यास केला. धर्मसत्तेला आधुनिक युगात साम्यवाद आव्हान देईल म्हणून त्यांनी पारनेरलाच आपली कर्मभूमी बनविली. डॉ. रामचंद्र महाराजांचे आजोबा श्री गणेशगुरु हे देवज्ञ ब्राम्हण होते. त्यांच्या मृत्यूसमयी रामचंद्र महाराजांचे वडील प्रल्हादगुरुसात वर्षाचे होते. पुढे ते उपजिवेकेसाठी इंदौरला गेले. तेथेत्यांनी वेदविद्येचे अध्ययन केले. त्यांना १६ जुलै १९१६ रोजी गुरुपौणिमेच्या दिवशीत्यांच्या पत्नी यमुनाबाईनामुलगा झाला. तेच रामचंद्र, त्यांनी प्रथम वर्षातच कॉलेज सोडून, भूगर्भशास्त्र, रत्नशास्त्र, आयुर्वेद, अर्थशास्त्र, साम्यवाद, इतिहास, ज्योतीशास्त्र, तत्वज्ञान आदि विद्या शाखेचे अध्ययन केले.रामचंद्र महाराज साहित्यिक, उत्तम कवी तसेच संगीताची त्यांना चांगली जाण होती. अध्ययन चालू असतानाच त्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक आंदोलनात भाग घेतला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे व हिंदूमहासभेचे कार्य ते करीत होते. गांधीचे तत्वज्ञान व साम्यवादाचाही अभयास केला पण वेद, संतसाहित्य व अध्यात्म साधना यातच ते रमले. डॉक्टरेट मिळविण्यासाठी त्यांनी विश्र्वोत्पत्ती संबंधी एक प्रबंध बर्लिन विद्यापीठाला सादरकेला पण महायुध्दाच्या धामधुमित व गौड पादाचार्याचा अजातवाद यांना पूर्वपक्ष बनवून आपला स्वतंत्र पूर्णवाद सिध्दांत जगासमोर मांडला. या प्रबंधाला बनारमधील भारत धर्म महामंडळ या प्राचीन विद्यापीठाने १९४८ साली डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. नंतर पूर्णवादाचा जनसामान्यांत प्रसार करण्याचे कार्य करण्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. रामचंद्र महाराज चमत्कार, भविष्य वर्तविणे, समाधी लावून विलक्षण गोष्टी सांगतो, दैवीशक्तीने भस्म काढणे आदी गोष्टींच्या विरुद्ध होते. ते म्हणत, ईश्वराच्या साक्षात्काराबरोबर त्यांच्या कृपेचीही आवश्यकता आहे. साक्षात्कार नाही झाला तरी जीवन जगता येते. पण ईश्वरकृपेवाचून जीवन जगता येत नाही. त्याच्या कृपेची प्राप्ती करुन घेण्यातच जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे. त्यामुळे पूर्णवादाला हजारो अनुयायीलाभले. २८ एप्रिल १९८० साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर यांचे चिंरजीव विष्णू महाराजांनी गादी सांभाळली. ते अर्थशास्त्र व एल.एल.एम. झालेले असून इंदौरच्या हायकोर्टात त्यांनी वकिलीही केली आहे. कॉलेजचे शिक्षण चालू असतानाच त्यांनी पूर्णवादाचा अभ्यास करुन व्याख्याने देण्यास सुरुवाद केली त्यांनी अनेक पूर्णवादी संस्थांची स्थापना केली. सध्या ते पूर्णवादाच्या प्रसारासाठी भारतभर भ्रमण करीत असून अमेरीका व ऑस्ट्रेलियाचाही दौरा करुन तेथे व्याख्याने देत आहेत. भारतात सर्व राज्यात असलेला हा पूर्णवादी परिवार जगात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, गल्फमध्येही आहे. डोक्यावर काळी टोपी व अंगात घोतर व नेहरु शर्ट घातलेले पुरुष तसेच महिला नऊवारी किंवा सहावारी साडीत या ठिकाणी दिसतात. उघडया बोडख्या डोक्याने राहू नये व स्वंतत्र ओळख म्हणून काळी टोपी घातली जाते. विष्णू महाराजांची दुपारी १२ ते २ बैठक असते. भक्तवर्ग यावेळी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. त्यांच्यावरयोग्य संस्कार करुन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्यावर योग्य संस्कार करुन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात.प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळया देवतांची उपासना सांगून प्रत्येकाच्या समस्यांचे व्यक्तिगत पातळीवर समाधान केले जाते. पूर्णवादाचे कार्य विष्णू महाराजांचे चिरंजीव गणेश लक्ष्मीकांत पुढे नेत आहेत. पारनेरकर गुरुसेवा मंडळव पूर्णवादी युा फोरम मार्फत हे काम चालू असून विविध उत्सव युवक शिबिर व युवकक्रांती या मासिकामार्फत ते चालू आहे. शिबिरामधून युवकांना व्यक्तिमत्व विकास व कौशल्याचे शिक्षण दिले जाते. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे विभाग पाडून वर्षभर शिबिरे आयोजित केली जातात. काशमीर पीडितांसाठी काही करण्यासाठी व अनाथ मुलांसाठी काही योजना करण्याच्या विचाराने युवा फोरमचे एक मंडळ काश्मिरला जाऊन आले. गुरुसेवा मंडळामार्फत महाराष्ट्रातील ५१ गावांमध्ये जीवन कला मंडळे स्थापन करुन रामचंद्र महाराजांची मंदिरे उभारण्यात आली असून या ठिकाणी पूर्णवादाचे कार्यक्रम चालतात. पूर्णवादी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वयोवृध्द लोकांसाठी पूर्णवाद अभ्यास व निवास, भोजनाची व्यवस्था केली जाते. पूर्णवादी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे हिंगोली जवळील हिंगणेगाव, बीडजवळील मांजरसुंभा व पनवेलमधील व शीवली या ठिकाणी शाळा चालविल्या जातात. तसेच सर्वांसाठी पूर्णवाद पत्ररुपी अभ्यासक्रम चालविला जातो. पारनेर पचांगही काढले. तसेच पूर्णवादी संगीत कला अकादमी व संगीतोपासना संगीत विद्यालय चालविले जाते. भारतीय पूर्णवादी नारी फोरमचेही महिलांसाठी कार्य चालू असून त्याच्या अध्यक्षा रंजना चौहान आहेत. त्यांची अधिवेशन जळगाव, दिल्ली, नंतर नोव्हेंबर ०३ मध्ये काश्मीरमधील वैष्णोदेवीजवळील कटरा या गावात झाली. तसेच अभयास शिबिरे दरवषी घेतली जातात. तुळशीचे रोप आपल्या परिसरातील प्रदूषण नाहिसे करते म्हणून तुळशीचे रोप प्रत्येक महिलेने लावावे, यासाठी तुलसीसंवर्धन अभियानही चालू आहे. पारनेर दत्त जयंती उत्सवाचे संयोजन नारी फोरम मार्फत केले जाते. अंमळनेर येथे जगातील पहिले मातृपितृ मंदिर त्यांनी उभारले आहे. येथील प्रल्हादगुरु वेदशाळे मार्फत वेदाचे शिक्षण देणारे सहा महिन्याचे, एक व तीन वर्षांचे असे वेगवेगळे अभ्यासक्रम चालविले जातात. कोणीही हे शिक्षण घेऊ शकतात. तसेच पूर्णवादी तसेच पूर्णवादी बùक व पतसंस्थाही असून विमल प्रकाशनामार्फत साहित्य व मासिक प्रकाशति केले जातात. आतापर्यत ८० च्या व ग्रंथ, पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. पारनेर येथे नुकतेच उपासकनिवास बांधण्यात आले आहेत. येथे सुमारे एक हजार लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच अनेक जुने वाडेही आहेत. गणेश हॉल येथे मोठे स्वयंपाकघर असून तेथे जेवणाऱ्या पंगती होतात. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांना भगवान शंकराचा अवतार मानून त्यांची मंदिरे स्थापन करावीत. त्यांचे पूजन, रुदाभिषेक व्हावा असा रामचंद्र महाराजांचा संकल्प होता. त्याच प्रेरणेने आता शिव राममंदिराची उभारणी होत असून शिवाजी महाराज व रामचंद्र महाराज यांचे एकत्र शिव-राम मंदिर ओरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथे उभारण्यात येत आहे. काळजी ओळख करुन घेऊन जगण्याचे कोशल्य आत्मसात करुन ईश्वराची कृपा उपासनेव्दारे प्राप्त करुन जगणारा कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकतो. प्रपंच आणि परमार्थाला पूरक बनविणार पूर्णवाद सुशिक्षितांबरोबर सर्वांनाच आकृष्ट करुन घेत आहे.