पारनेर तालुक्यातील जलसिंचनाचे स्वरूप

अहमदनगर जिल्हातील पारनेर तालुका हा भौगोलिक दृष्टिकोनातून पठारावरील भाग आहे. पारनेर तालुका सतत कोणत्या ना कोणत्या भागात दुष्काळ स्थितीचे स्मरण करून देतो. पावसाळ्याची सुरवात व शेवट यांच्या दरम्यानच्या काळात अत्यल्प पावसामुळे अवर्षण स्थिती निर्माण झालेली दिसते.
पारनेर तालुक्यातील जलसाठ्यातील प्रकल्पातही जलसाठ्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे. पारनेर तालुक्यातील प्रकल्पातही विभागावर पाणी साठा पुढीलप्रमाणे
अ. क्रमांक विभाग क्षमता तलाव संख्या
1 पारनेर 91.33 26
2 कान्हूर पठार 185.32 36
3 अळकुटी 32.37 7
4 निघोज 50.38 11
5 वाडेगव्हाण 74.74 16
6 जवळा 30.66 08
7 सुपा 106.94 24
8 जामगाव 59.18 18
9 टाकळी ढोकेश्वर 194.56 38
10 ढवळपुरी 239.76 42
एकूण 1065.64 226
सारणी वरून असे दिसून येते कि फक्त ढवळपुरी भागात सर्वात जास्त पाण्याचे नियोजन झालेले आहे तर सर्वात कमी जवळा भागात तलावांची संख्या असून त्यांचे शेकडा प्रमाण 2.87 टक्के इतके आहे . तालुक्याच्या दृष्टीने विचार केला तर प्रथम ढवळपुरी विभागामध्ये सर्वात जास्त बंधारे आहेत. त्यामुळे जलसाठ्याची उपलब्द्धता या भागात जास्त असल्याची दिसून येते. तर त्या खालोखाल टाकळी ढोकेश्वर गटात जलसाठ्याची उपलढ्यात 18.25 टक्के आहे. हा भाग तालुक्याच्या उत्तर भागात येतो. त्या मध्ये आणखी जामगाव विभागाचा समावेश होतो. त्या एकूण तालुक्याच्या उत्तर भागात 46.66 टक्के जलसाठ्याचे नियोजन आहे. त्यातील बरेचसे पाणी शेतीसाठी न वापरता पेयजल म्हणून उपयोग होतो. तालुक्याच्या दक्षिण भागात 14.06 टक्के तर पश्चिम विभागामध्ये अळकुटी व कान्हूर पठार भागात 20.42 टक्के चा समावेश होतो. पारनेर तालुक्याच्या दक्षिण विभागातील काही भागात कालव्यामुळे पीक पाण्याची स्थिती बारी असल्याचे दिसत असले तरी मोजक्याच पावसामुळे भूजल पातळीत वाढ झालेली दिसून येत नाही.
त्यामुळे च पावसाळ्यानंतर काही भागात पाणी समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता नित्यनियमची झाली आहे. कारण जलसंधारण कामावर अधिक भर न दिल्याने तालूक्यातील बऱ्याच भागात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. सततचा दुष्काळ , रोजगारीच्या अभाव, उद्योग, शिक्षण, पाणी , आरोग्य, इ. मूलभूत सोयीच्या विकासामुळे दुर्लक्ष होत असल्याने खेड्यातून स्थलांतरित होणाऱ्या संख्येत भर पडत असल्याने दिसते. ग्रामीण भागातील पाणी, वापराच्या सवयी औद्योगिक प्रदेशाच्या पट्ट्यात पाणी पुरवण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेवर ताण पडलेला दिसून येतो.